प्लॉटची निवड करताना
प्लॉट कसे असावे?
- चौरस आकाराचा भूखंड सर्वश्रेष्ठ समजला जातो.
- दुसरा सर्वश्रेष्ठ पर्याय आयताकार भूखंड होय.
- प्लॉटचा उतार नेहमी उत्तर, ईशान्य, पूर्वेला असणे चांगले.
- प्लॉट नैऋत्यला उंच झालेला असावा. ईशान्य कोन वाढलेला प्लॉट देखील शुभ
मानला गेला आहे.
- वास्तू घेताना भौगोलिक विचार केल्यास आपल्या प्लॉटच्या उत्तर, ईशान्य व पूर्व
दिशेला नदी, तलाव, ओढा अशा प्रकारचे जलाशय असावे.
- वास्तू घेताना नैऋत्य दिशेस, दक्षिण दिशेस डोंगर, टेकडी, उंच झाडे, उंच इमारती
असणे सर्वात चांगले.
प्लॉट कसे नसावे?
- त्रिकोणी, वर्तुळाकार, अंडाकार त्रिशूलाकार प्लॉट घेणे टाळावे.
- आग्नेय, नैऋत्य, वायव्य कोन वाढलेली टाळावे.
- दक्षिण व नैऋत्य दिशेला उतार, नदी, विहीर, नाला, जलाशय टाळावे.
- उत्तर, ईशान्य, व पूर्व दिशेत डोंगर, टेकडी, उंच इमारती टाळावे.
- आपल्या प्लॉटच्या जवळ हॉस्पिटल, पोलीस स्टेशन असू नये. या परिसरात
कायम दुःखी आजाराने पिडीत लोकांचा वावर असतो. पोलीस स्टेशन असेल तर
कायमच गुन्हेगारी, भांडण, राग, उद्वेग असे वातावरण निर्माण झालेले असते
म्हणून टाळावे.
- प्लॉटच्या समोरून स्मशानाचा रस्ता असू नये किंवा आत्ताच्या परिस्थितीत
बहुमजली इमारती असतात तर घराच्या टेरेसमधून स्मशान दिसू नये. रोज
प्रेतयात्रा दिसणे किंवा प्रेत जळताना दिसणे आपल्यामध्ये नकारात्मक भावना
निर्माण करू शकते.
- वास्तुच्या १०० मीटर पर्यंत वड, पिंपळ तथा उंबराचे झाड असू नये.
कोणताही प्लॉट किंवा फ्लॅट घेताना तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा नाहीतर नंतर
पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते.